काल सकाळपासून माझ्या डोक्याचा केमिकल लोचा झालाय रे. मी आपलं २ ऑक्टोबरला आपल्या महात्मा बापूंच्या अहिंसा, सत्याचे प्रयोग,अतिविशिष्ट पद्धतीने झोपून ब्रम्हचार्याची परीक्षा देणे वा घेणे :), यापैकी कोणत्या तत्वज्ञानाचा प्रसार, पुरस्कार करणारे स्टेटस लावायचे याचा विचार करत होतो. पण सकाळ सकाळी बातमी यायला चालू झाली, ते दुबईवरून तेल अवीवला निघालेलं फझेड १०७३ विमानातं काही गडबड झालीये.
त्या विमानाच्या "स्मित" नावाच्या भारतीय वैमानिकानं, जीवाची बाजी लावून, गांधीगिरी करून, त्याच्या सहकारी वैमानिकाचं त्या थरारक परिस्तिथीत १०-१५ मिनटात मन परिवर्तन केलं. त्याला म्हणे प्रेमाने कुरवाळून, "स्मित"हास्य करून, व्हय, अगदी गांधींजीसारखाच, त्याला अहिंसावादी बनवलं आणि म्हणे १७५-१८० काही तरी फडतूस प्रवाशांचे जीव वाचवले. स्मितच चुकलंच जरा, त्यानं त्याच्या सहकारी वैमानिकाला त्याला काहीही हिंसा करू दिली नाही म्हणजे काय !!! तो बिचारा कोठल्या तरी दमनवादी परिस्थिती वाढलेला, जगणारा, काई ते - उत्पिडीत , oppressed ओ झालेला (पीडित वाचा हवं तर, नाही तर शब्दकोश शोधावा लागलं), त्यानं त्याच मन मोकळं करायचं कुठं. फ्लायदूबाई या कंपनीची मोट्ठी चूक, सांकेतिक संदेश द्यायचा असतो काही गांधीवादी संघटनांना, त्यांना विचारून फयु - ७२ (FU - ७२) असं फ्लाईटचं नंबर द्यायला पाहिजे व्हता.
स्मितच्या गांधीगिरीमुळे सगळ कस छान जुळून आलं, बुबीवूड उर्फ बॉलवूडमधील राजू हिरानी -कबीर खान दिग्दर्शक मंडळी जाम लावून लावून खुश झाली. का म्हणून काय राव, नवीन चित्रपटाची कथा मिळाली ना - आता मुन्नाभाई पायलट येणार. मी आनंदाने उड्या मारत, अहिंसा अहिंसा करत टाळ्या पिटत होतो, तोवर शेजारचा ओरडला ये, का बोंबलतोश रे, एक तर ड्राय दिवस !! कसे काढायचे २४ तास ना पिता. मी लगेच अहिंसावाद समजावयाला घेतला, तोच मला त्याच्या हातात रिकामी बाटली दिसली, मग मी त्याला गांधीजींची एक प्रतिमा दिली आणि म्हणालो कर मज्जा, शेंगदाणे -कांदा-टोमॅटो घे चकण्याला, अश्या रीतीने त्याला मी गांधींचा अहिंसावाद शिकवला.
तर, मित्रांनो, म्हणा - अहिंसा अहिंसा, अहिंसा, किती महान तत्वज्ञान. जय गांधीजी, कोण तो म्हणतोय जय जवान जय किसान तसलं काय म्हणायचं नसतं २ ऑक्टोबरला आणि आता चाललो मी द्रिश्यम ३ बघायला.
#GandhiJayanti #SmitMachchhar #FL1073 #FU72 #1Oct26 #Flydubai #Flight #Satire