Sunday, 30 January 2022

गांधी आडवा येतो

शफायत खान यांचं या नावाचे एक नाटक आलं होतं २०१२ साली. या नाटकातील लौकिक अर्थाने टपोरी गुंड असलेला "लाल्या" हा नायक आहे आणि त्याचा नाक्यावरील टपोरी गुंड ते गांधीजींच्या विचारांचा अनुयायी होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर त्याची आयुष्यात गोची होत जाते कारण; तो गांधीजींच्या  विचारप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात वागू लागतो. 

लाल्या त्याच्या प्रेयसी मायाशी लग्न करतो आणि मायाचे वडील प्राध्यापक बुध्दिभास्कर आणि आई संध्या यांना गुंड लाल्या जावई म्हणून पसंत नसतो. लाल्याचा टपोरी अवतार व त्याच्या तोंडातील शिव्या हासडणारी भाषा ऐकून दोघे पतिपत्नी हतबुद्ध होतात. अशातच प्राध्यापकांना एक फोन येतो आणि अचानक प्राध्यापक स्वतःहून लाल्याला घरी ठेवून घेण्यास तयार होतात आणि ते दोघे त्याला गांधीजींचे पुस्तकं वाचायला लावून, चमत्कार करतात. गुंड लाल्या अचानक आता गांधीवादी रिक्षावाला बनतो. अहिंसा स्वीकारतो, दारू- मांस वर्ज करतो फक्त गांधींसारखे ब्रह्मचर्य स्वीकारायला मायामुळे जमत नाही. प्रामाणिकपणे जगायला लागतो आणि मग, त्याच्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात कि, त्याला क्षणोक्षणी गांधी आडवे जायला लागतात. 

महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप येऊन प्राध्यापक बुध्दिभास्करना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. इकडे मायाचा भाऊ श्याम प्रेमभंगामुळे मनोरूग्ण होण्याच्या अवस्थेत आहे. त्याची मैत्रीण डॉली त्याला सोडून फिरोज नावाच्या एका दुसर्‍याच मुलाबरोबर गेल्यामुळे तो सूडाने पेटलेला आहे आणि त्याचवेळी मानसिक आजारी पडल्याची चिन्हे दिसत आहे. 

काही काळातच प्राध्यापकांवरील बालंट दूर होते, फिरोज एका आरोपावरून तुरूंगात जातो, श्याम सुधारतो व त्याचा आत्मविश्वास परत येतो. प्राध्यापकांचे निलंबन रद्द होऊनसुद्धा ते नोकरीचा राजीनामा देऊन आपल्याच चुनीलाल नावाच्या एका बिल्डर मित्राच्या मदतीने श्यामला बरोबर घेऊन गृहबांधणीचा  व्यवसाय सुरू करतात. पण तिथेही लोकांकडून नवीन इमारतीसाठी आगाउ पैसे घेऊनसुद्धा काम सुरू होउ शकत नाही कारण त्या जागेवरची झोपडपट्टी उठत नाही. त्यामुळे लोक पैशासाठी तगादा लावतात.

लाल्या त्याच झोपडपट्टीत रहात होता हे त्यांना समजते. पण झोपडपट्टी कशी उठवावी, पैशाचा तगादा लावणार्‍यांचा बंदोबस्त कसा करावा आणि चुनीलालकडे दिलेले लोकांचे पैसे कसे परत मिळवावे या विचाराने प्राध्यापक हतबुद्ध होतात.

त्याचवेळी प्राध्यापकांचें शेजारी व त्यांचा मत्सर करणारे नाटककार जेऊरकर एक नवीन नाटक लिहितात त्यात प्राध्यापक व त्यांच्यावर अतिप्रसंगाचे झालेला आरोप हेच कथासूत्र असते. हे नाटक रंगमंचावर आले तर आपली खूप बदनामी होईल हे प्राध्यापकांच्या लक्षात येते. इकडे फिरोज तुरूंगात गेल्यावर पुन्हा एकदा डॉली व श्यामचे सूत जमायला लागते व त्यामुळे श्यामवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियाचा संताप होतो. श्याम पुन्हा एकदा आपल्यामागे यावा यासाठी ती प्रयत्न करू लागते.

एकंदरीत प्राध्यापक, श्याम व प्रिया हे आपापल्या समस्यांनी त्रस्त होऊन गेले असतात. प्राध्यापकांना नाटककार जेऊरकर, चुनीलाल, चौकशी समिती इ.चा बंदोबस्त करायचा असतो व त्याचबरोबरीने चुनीलालने ताब्यात घेतलेले लोकांचे पैसे परत मिळवायचे असतात आणि इमारतीसाठी झोपडपट्टी ऊठवायची असते. प्रियाला डॉलीचा ससेमिरा कायमचा चुकवायचा असतो. झोपडपट्टीसाठी आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्याला श्यामला संपवायचे असते.

आपल्याला लाल्या मदत करेल अशी त्यांची आशा असते, पण लाल्या गांधीजींच्या विचारांनी भारावून गेलेला असल्याने व आपले सर्व काळे धंदे, टपोरीगिरी त्याने बंद केलेली असते. अचानक सर्वांच्या मनासारखे होते. फिरोज तुरुंगातून सुटतो व डॉलीबरोबर लग्न करून तो शहर सोडून जायचे ठरवितो. श्याम प्रियाकडे प्रेमयाचना करून तिचे प्रेम स्वीकार करतो. चुनीलालने ताब्यात घेतलेले ४० लाख रूपये प्राध्यापकांना परत मिळतात. सामाजिक कार्यकर्ती रेल्वेरूळावर मेलेला आढळतो. नाटककार जेऊरकरांच्या चेहर्‍याला काळे फासले जाते व शेवटी पोलिसांनी *लाल्याचे एनकाऊंटर केल्याची बातमी येते.*

नक्की काय होते? लाल्या सुधारलेला असताना लाल्याचा एनकाऊंटर का होतो? चुनीलाल घेतलेले पैसे कसे परत देतो? फिरोज का तुरूंगात जातो व नंतर तो कसा सुटतो? तो शहर सोडून जायचे का ठरवितो? जेऊरकरांच्या चेहर्‍याला कोण काळे फासतो? सामाजिक कार्यकर्ता शेट्टी कसा मरण पावतो? या सर्वांची उत्तरे, गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसा, साधी राहणी, दारू -मांस सेवन आणि शारीरिक इच्छाचा (ब्रम्हचर्य) यांचा त्याग या तत्वज्ञानात आहेत. कारण, लोकांना, राजकीय मंडळींना फक्त आभासी, आदर्शवत विचार फक्त आणि फक्त दुसऱ्यांना सांगण्यापुरते हवे आहेत, त्याप्रमाणे धोरणं राबवून देशाचे, समाजाचे आणि त्यायोगे जनतेचे भले करण्यासाठी खरेच पाहिजे आहेत का ? असा प्रश्न पडतो, कारण सध्या आजूबाजूला जे घडते आहे, ज्या पद्धतीची धोरणं महाराष्ट्रात आखली जात आहेत, ते बघून हेच म्हणावे वाटते *गांधी आडवा येतो* आणि आम्ही लोक, त्यांच्या विचारांविरुद्ध वागून गांधीजींचा रोजच खून करतो.  

सध्या लोक आणि बरेच तथाकथित गांधीवादी राजकीय नेते, नुस्ताच जिभेचे पल्हाळ लावतात की गांधीजींच्या विचारांची देशाला, तरुण वर्गाला, भावी पिढीला अंत्यत गरज आहे आणि गोडसेंच्या नावाने खडे फोडून, म्हणतात गोडसेने गांधींना मारलं पण त्यांचे विचारांना, त्यांच्या तत्वज्ञानाला मारू शकला नाही. पण आपण कधी त्यांच्या विचारानुसार वागतोय का? वागलो तर सध्याच्या निर्दयी दुनियेत जगू शकू का? गांधींजींच्या विचारानुसारच दारू आणि नशा करण्याची साधने यावर बंदी असावी असे मार्गदर्शक तत्व (अनुच्छेद ४७) साविंधानामध्ये आहे आणि सध्या, वाईन -बियर किराणा दुकांनामधून विकली जावी म्हणून शासन धोरण बनवत आहे. या निर्णयाला विरोध करणारे म्हने शेतकरी विरोधी होतात. ड्राय डे आहे म्हणून गळे काढणारे तर गल्लोगल्ली दिसतात आणि नशेची साधने, हर्बल तंबाखू म्हणून विकली जातात आणि ड्रग्ज विक्रीच्या आंतराष्ट्रीय टोळीचा भाग असणाऱ्या सुपरस्टारच्या पोरग्याला जामीन मिळावा म्हणून माध्यमे, काही टुच्चे नेते आगडपाखड करतात, त्याला पकडणाऱ्या अधिकाऱ्याचाच लाल्या करून टाकतात. 

शेवटी काय तर, गांधी आडवा येतो .. 

(अनुच्छेद ४७ - https://www.constitutionofindia.net/constitution_of_india/directive_principles_of_state_policy/articles/Article%2047) 

गांधीजींची पुस्तकें 

१) https://www.mkgandhi.org/ebks/India-Dreams.pdf

२) https://www.mkgandhi.org/ebks/hind_swaraj.pdf

Saturday, 29 August 2020

टाळेबंदी आख्यान 

आपण सगळेच स्वानुभवातुन किंवा दुसऱ्यांचें अनुभव वाचून, बघून त्यातून काही घेण्यासारखं असेल तर नवीन काही तरी शिकत असतो आणि नसेल काही घेण्यासारखं तर मनोरंजन म्हणून गोड मानत असतो.

कोरोनामुळे आलेल्या  टाळेबंदीत घर"कोंबडा" झाल्यामुळे आलेल्या अनुभवाचे सर्वात मोठे संचित म्हणजे, घरी असल्यावर कधी आपले तोंड उघडावे (उचकटावे म्हणायचे होते पण असो) आणि कधी बंद ठेवावे यांचे इंगित उमजलं. जेणेकरून आपले साध्य (खाण्यापिण्याचे, भजी -वडे, चहाचे वगैरे) साध्य होतील. पुर्वी लोकांना अमोल पालेकरचे गाणे आठवायचे "गोलमाल है भाई सब गोलमाल है", आता मला आठवते "जपून जपून जपून जारे, पुढे धोका आहे". महाराष्ट्राची हास्यजत्रा बघण्याचा परिणाम असावा. 

अजून एका सत्याचा साक्षात्कार म्हणजे स्वयंपाकघर खरोखरच एक प्रयोगशाळा आहे. वेगवेगळे चविष्ट पदार्थांची भट्टी जमवण्यासाठी कारभारणीला करावे लागणारे प्रयोग बघणे जणु; विणाताईंचे "एक होता कार्व्हर" वाचण्यासारखे आहे. याचबरोबर घरी असल्यामुळे एकंदरीतच साफसफाई करावी असा अलिखित नियम असतो बहुतेक, कुठे काही कचरा, धुळ वगैरे दिसल्यास "तु तु मैं मैं" न करता मुकाट्याने झटकनी शोधावी. कारभारणीसोबत असाच स्वच्छतेचा प्रयोग करतां लक्ष्यात आले कि साधारण २०-२१ डब्बे (लहान, मध्यम आणि मोठे अशा आकाराचे) आणि ८-१० काचेच्या बरण्या आहेत. दर सहा महिन्यातुन एकदा हा स्वच्छतेचा प्रयोग करावा लागतो, मदत केली तर घरात होऊ शकण्याऱ्या शाब्दिण्विक (शाब्दिक +अण्विक) युद्धाचा धोका टळतो. 

अमेरिका - उत्तर कोरिया, भारत पाकिस्तान यांच्यातील अण्विक युद्धाचा धोका, जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणाच्या समस्या यांसारख्या वैश्विक समस्यानंतर, मला सर्वात जास्त भेडसावणारी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे, स्वयंपाकघरातील तेलकट -मळकट कि धुळकट अर्थात "तेलमिश्रित धुळमळकट" डब्बे आणि डब्ब्यांची झाकणे कमीतकमी कष्टात, दीर्घकाळ लखलखीत -चकचकीत कशी राहतील ही होय. :) या घरगुती स्वच्छता अभियानामुळे जी महागडी शिडी घेतली होती, तिचा पुरेपूर वापर झाल्यामुळे चुटपुट लागायची कमी झाली आणि घरातील कोपऱ्या कोपऱ्यामधे महाजाळीराज कोळीराज यांनी तयार केलेले फ्रॅक्चल (fractal) नक्षीकामाचे सौंदर्य बघून मी धन्य पावलो. 

लहान लहान गोष्टीत डोंगराएवढा आनंद असतो आणि तो हवा असेल तर घरातील लहान मुलाबरोबर लहान होऊन खेळले की तो गवसतो. पुन्हा एकदा आपले लहानपणीचे छंद पुरवून घेतले, गोट्या -विटीदांडू- खेळता नाही आले पण नुरा कुस्ती, टेररसवर क्रिकेट अन पळापळ, कॅरम, बुद्धिबळ, अंताक्षरी वगैरे वगैरे सगळं झालं. कराओकेचे  ऍप वापरून ७०-७५ गाणी रेकॉर्ड केली, ८ वर्षे हॉस्टेलवर राहायला असतानाचा बाथरूमी रियाझ कामी आला. :) पोराने एकदा विचारलाच मला, तुम्ही का म्हणता गाणी. 

मुलांचे निरागस प्रश्न कधी कधी चकित करून चक्कीत जाळ करून जातात. मागील आठवड्यातच त्याने मला गुगली टाकला, बाबा जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण ओ? मला पटकन काय सुचलंच नाही, बुद्धिमत्ता या लौकिक अर्थाने सांगावे तर कोण आहे सध्या सर्वात बुद्धिमान व्यक्ती, त्याची/तिची बुद्धिमत्ता कोणत्या कसोट्यावर ठरवली गेली असं काहीस मनात येऊन गेलं. उत्तर द्यायचं राहलयं अजून. 

सवयीप्रमाणे काही नवीन पुस्तकं ऑनलाईन खरेदी केली. सगळं काही ऑनलाईन झालयं, गावी न जाता आल्यामुळे गणपती आरती आणि प्रसादसुद्धा ऑनलाईनचं खाल्ला यावर्षी. मित्रांशी भेटणं-बोलणं ऑनलाईन झालं, फक्त हिरव्या हिरव्या डोंगरदऱ्यात फिरताना अंगावर येणारा आल्हाददायक वारा, पाण्याचा खळखळ आवाज ऑनलाईन मिळत नाहीये. 

--मधुमय मृदगंध 
२९ ऑगस्ट २०२०

Sunday, 7 June 2020

अनामिक नातं

काही व्यक्ती आपल्याला कधीही न भेटता, त्यांचा सहवास न लाभतातसुद्धा का जवळच्या वाटाव्यात हे एक अनामिक गूढ आहे. मागील आठवड्यात म्हणजे शनिवार ३० मेला रात्री ९:३० ते १०च्या दरम्यान सौंच्या हॉस्पिटलमधील सहकारी, तिची चांगली मैत्रिणीचा व्हाट्सअँप संदेश आला कि, तिचे वडील आजारी आहेत, तिने काही मेडिकल चाचण्या केल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स तिने व्हाट्सअँपवर पाठवले आहेत, त्यावर तिला सौंकडून सल्ला हवा होता

त्यांच्या चाचण्यामधून स्पष्ट दिसत होतं काही तरी मोठी गडबड आहे शरीरात पांढऱ्या पेशींची संख्या २६,००० झाली आहे आणि त्यामुळे त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करणे, त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. त्यात तिच्या वडिलांना ह्दयविकार, डायबेटीस या रोगांचा त्रास आहे, त्यामुळे तर पुढील कारवाई त्वरीत होणं अत्यावश्यक होतं. तिचा भाऊ बिचारा, रात्री १:३० वाजेपर्यंत वेगवेगळ्या ९-१० हॉस्पिटलमध्ये वडिलांना दुचाकीवरून घेऊन गेला (अंधेरी पुर्व-पश्चिम उपनगर भाग, ते राहतात घाटकोपरला), आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फोनवरून विचारणा करत होतो बेड रिकामे आहेत का?? बऱ्याच मित्रांना फोन केला, काही सामाजिक -राजकीय कार्यकर्त्यांना फोन केला, कोरोना चाचणी केल्याशिवाय कुठेही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेत नाहीत असे सांगण्यात आले.

रूग्णाला ताप आहे हे बघितल्यावर सगळ्या हॉस्पिटलमध्ये हेच सांगण्यात आले, एका हॉस्पिटलने एक्स रे काढण्यासाठी ५,००० रुपये उकळले. ९-१० हॉस्पिटल फिरल्यावरही वडिलांना उपचार मिळत नाहीत म्हटल्यावर, तीचा भाऊ, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि मित्र हताश होऊन घरी परतले.

संघाच्या एका कार्यकर्त्यांने त्यांना मुंबई महानगरपालिकेमार्फत कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सर्व माहिती दिली, चाचणीसाठी नंबर लावला. २४ तासानंतर म्हणजे १ जुनला त्या रूग्णांची चाचणी झाली, जी कोरोना पॉझिटिव्ह आली, हे समजलं २ जुनला आणि त्यादिवशी संध्याकाळी त्यांना अंधेरीच्या सेवन हिल्स या इस्पितळात ICU बेड मिळाला. आम्हा सगळ्यांना वाटलं चला, उपचार तरी चालू झाले. पण खरी लढाई आता होती, आतापर्यंत बेड मिळवण्यासाठी हातघाईची, लुटुपुटीची लढाई होती.

कोरोना रूग्ण, हॉस्पिटलमध्ये ऐकटेच असतात. घरातील व्यक्ती बरोबर नसतात, ना कोणी मित्र-नातेवाईक भेटायला येऊ शकतात. सगळ्याला मनाई आहे, त्यात जर रूग्ण ज्येष्ठ नागरिक असेल तर, ते ऐकटेच असल्याने, आजुबाजुला असलेली परिस्थिती बघून आणखी निराश, हतबल भावनांनी घेरले जातात. त्याच्यांशी फक्त फोनवरून बोलणं होतं. तिथली परिस्थिती फक्त फोनवरून समजते, प्रत्यक्ष डोळ्याने काही बघता येत नाही. अशा वेळी त्या रूग्णांची मानसिक स्थिती, त्यांच्या कुंटुबातील लोकांची अवस्था काय असेल याचा विचार करून अंगावर शहारेच येतील.

काल रविवार ७ जुन, दुपारी बातमी आली की ते काका आपल्याला सोडून गेले. गेल्या आठवड्यातील या अनुभवाने खुप अंतर्मुख केलं आहे मित्रांनो, का कुणास ठाऊक, त्या देसाई काकांबद्दल मनात ऐव्हढी सहानुभूतीदायक हळहळ का निर्माण झाली. ज्यांना कधी मी, माझी बायको भेटलो नाही, बघितलं नाही, ही बातमी समजल्यावर मनात अस धस्स झालं.. जवळचच कोणी तरी सोडून गेलं आहे असं वाटत राहिलं.

कदाचित, मनात भितीने शिरकाव केला आहे. सौची मैत्रीण, स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या वैकुंठ प्रवासाच्या कार्यास जाऊ शकली नाही. तिच्या भावाने, एकट्यानेच ते कार्य उरकले. कसं वाटलं असेल त्याला; एकट्याने त्या स्मशानात, वडिलांचे निर्जीव शरीर शेवटचं न्याहळताना, पार्थिवाला अग्नी देताना. विचार करवत नाही, मती गुंग होते ...

हे सगळं लिहिण्याचं कारण, कदाचित आपण आपल्या आयुष्य खुपच ग्रहीत धरतो. सगळं ठीक आहे, होईल, सरकार हळूहळू पुर्वीप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मिशन बिगीन अगेन वगैरे राबवत आहे, पण काळजी घेणं खुप खुप गरजेचं आहे.

खासकरुन ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्यांना प्रवास करू देऊ नका, सकाळी -पहाटे फिरायला जाताना शक्य तितकी प्रतिबंधकात्मक काळजी घ्या. उषःकाल होईल जेव्हा केव्हा व्हायचा तेव्हा, तो बघण्यासाठी स्वतः ची काळजी घ्या.

- मृदगंध ७ जुन 

Friday, 13 September 2019

किसका होगा Thinkiस्तान
Thinkiस्तान ही वेबसिरीज mxplayer रिलीज केली आहे. याचे दोन सिझन प्रसारित झाले आहेत. ही सिरीज म्हणजे १९९० दशकातील जाहिरात बनवणाऱ्या MTMC कंपनीत काम करणाऱ्या हेमसुंदर आणि अमित श्रीवास्तव अशा दोन मित्रांची कथा आहे. त्यांच्या करिअरच्या प्रवासाची ही कथा आहे.
जाहिरात, संवाद या सेवा उद्योगाची आणि एकंदरीतच माध्यम जगताची ओळख करून देणारी खुप सुंदर कथा आहे. प्रत्येक उद्योग क्षेत्राचे स्वतःचे असे मोघम काही ठोकताळे, मुल्ये, संस्कृती, नियम असतात त्यामागील वैचारीक चौकट असते तशीच ती जाहिरात -संवाद या क्षेत्राचेदेखील आहेत. ही मुल्ये कशी अस्तित्वात आली आणि त्यामागील भुमिका काय आहे याची खुप सुंदर रीतीने ओळख या वेबसिरीजमधे करून देण्यात आली आहे.
जाहिरात बनवण्याची कल्पना सुचने ते एखाद्या प्रोडक्टच्या लॉचिंगचे पुर्ण कँम्पेन तयार करण्यापर्यंतच्या सर्व बारीक सारीक गोष्टी या मालिकेत दाखवली आहे. हेमसुंदर आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेला, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेला, इंग्रजीमधे सुंदर सुंदर कविता लिहीणारा आणि बेमालूमपणे जाहिरातीच्या संकल्पना मांडणार संवेदनशील उदारमतवादी, संवाद कौशल्य असलेला अशा तरुण.
तर अमित आहे मध्य प्रदेशातील भोपाळचा ज्याच पुर्ण बालपण, शिक्षण भोपाळमधे हिंदी माध्यमातुन झाले आहे. लाजरा बुजरा, बोलायला घाबरणारा पण जबरदस्त हिंदी कविता करणारा आणि तेवढ्याच ताकदीच्या छान छान भन्नाट जाहिरातीच्या संकल्पना डोक्यातुन पिकवणारा. भोपाळमधुन स्वप्नं घेऊन मुंबईत येतो आणि MTMC या जाहिराती बनवणाऱ्या कंपनीत; करामती करून नोकरी मिळवतो, हेमसुंदरसारखा मित्र त्याला इथचं भेटतो आणि मग सुरू होतो Thinkiस्तानचा जबऱ्याट प्रवास.
जाहिरात कशी बनते, ती बनवत असताना फक्त प्रोडक्ट काय आहे आणि त्याचे फिचर्स काय आहेत याचाच फक्त विचार होत नाही तर इतर किती तरी गोष्टींचा विचार केला जातो; त्या काय आहेत व त्यावर कसं काम केलं जातं या सगळ्या गोष्टी मालिकेतुन बघायला मिळतील. या मालिकेत जागोजागी पेरलेल्या कविता तर ऐवढ्या मस्त आणि अर्थपुर्ण आहेत की बस्स, परत परत ऐकाव्यात, ऐकत रहाव्यात अस वाटतं.
९० च्या दशकातील लिरील, धारा, हमारा बजाज सारख्या गाजलेल्या भरपुर जाहिराती आजदेखील आपल्याला भावतात. त्यांचा जन्म कसा झाला याची रंजक कथा आपल्यासमोर येते आणि त्याबरोबरच अमित आणि हेमाच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, त्यांचा मेंटॉर आशिक जब्बार, त्या दोघांची बॉस अनुष्का, त्या दोघांची प्रेमकथा, कामाच्या ठिकाणची मुल्ये, संस्कृती त्याचा वैयक्तिक आयुष्यात होणारा परिणाम, प्रभाव असा सगळा पसारा उलगडत जातो.
या सगळ्यातुन ही दोन मित्र झगडत, पडत नोकरीत प्रगती करतात आणि भरपुर पुरस्कार मिळवतात. अशी ही सुंदर आवर्जुन बघावी अशी वेबसिरीज आहे "किसका होगा Thinkiस्तान". नवीन कस्तुरीयासारख्या नव्या दमाच्या अभिनेत्याने दमदार अभिनय केला आहे. नक्की बघा.
सिझन दोनमधील मला सर्वात जास्त आवडलेली, भावलेली एक कविता जी कदाचित या मालिकेचेसुद्धा यथार्थ वर्णन करते असं मला वाटतं.
ये कहाणी है मुलाकातों की,
ये रवानी है जज्बांतो की,
अलमारी वादों की,
तिजोरी ख्वाबों की,
फिर भी है लापता, वो मंझिल, वो घर, वो गली
तकदीर है, या मजाक है,
जो नवाब था, आज राख है.
#Thinkiस्तान #जाहिरात #संवाद क्षेत्र

Season 1 - https://youtu.be/NdeRMtHxpBE

Season 2 - https://youtu.be/9za0IEQkGa4
हमेशा

तुम्हें क्या लगता है, जी पाता हूँ मैं
तुमसे दुर रहकर
ऐसा जरूर दिखता होगा मेरे बर्ताव से
ऐसा जब भी तुम्हें लगे, तो सोचना कुछ इन इशारों पर
कभी फूलों की महक, फुलों के बगैर हो सकती है
खाने का स्वाद बिना नमक हो सकता है
या फिर, कृष्ण कभी राधा से परे होकर पुरा हो सकता है

चेहरे पे मुस्कुराहट, ख़ुशी की महक
इसी वजह से है क्युँकि
तुम मेरे साथ हो, हमेशा

- मधुमय मृदगंध //११ सितंबर १९

Thursday, 13 June 2019

मनसोक्त

माळरानावर उनाड बागडून,
गवताच्या पात्याचें बाण मारून,
झाडांना हाताने -पायाने स्पर्श करून,
खूप दिवस झाले

गावातील जुन्या विहिरीत सूर मारून,
शाळेच्या मैदानातील गुलमोहर पाहून,
चटका मारणाऱ्या उन्हात फिरून,
खूप खूप दिवस झाले

गल्लीतील पोरांबरोबर हाफ पीच खेळून,
गटारीत गेलेला बॉल दोन बोटात उचलून,
भर दुपारी पळत येत; थंड पाणी पिऊन,
खूप खूप खूप .. दिवस झाले

उन्हाळाच्या सुट्टीत आवळे, चिंचा
कैऱ्या, जांभळं पाडून,
कावडीला नाही तर सायकलला घागरी बांधून,
खूप, खूप, खूप ..म्हणजे खूपच दिवस झाले

स्लो सायकलची रेस लावून,
चिखलात हात बरबटून अन किल्ला बांधून,
कोण पाणी उंच उडवत; विहिरीत गट्टा ऊडी मारून,
खूप, खूप, खूप ... खुप्पच दिवस झाले

थोडक्यात काय, मनसोक्त जगून...
खुप दिवस झाले

- मधुमय मृदगंध, १४/०६/२०१९

Monday, 3 June 2019

#आपण काय मिळवलं ?? - #शोध #चालू #आहे
सर, तुमच्यासारखं सर्वस्पर्शी, संपुर्ण विषयांना कवेत घेऊन, लिहणं जमणार नाही. तरीसुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय, काही चुकीचे संदर्भ वाटले किंवा त्रोटक असं वाटलं तर आपण ते समजून घ्याल अशी खात्री आहे आणि म्हणूनच हे धाडस केलं आहे.
https://www.facebook.com/rajendra.parijat/posts/10214740630814163 )
माहितीचा आणि अभिव्यक्तीचा महास्फोट मोबाईल या माधम्ययंत्राद्वारे गेल्या दशकभरमध्ये झाला आहे. इंटरनेटचा प्रसार जितक्या वेगाने होत आहे तेवढ्याच पटीत या स्फोटाची व्याप्ती वाढत आहे. या माहिती -अभिव्यक्तीच्या समुद्रमंथानाच्या स्फोटातून बाहेर पडलेली रत्न आहेत, अमृतही आहे तसेच विषसुद्धा आहे. ग्रामीण भागात गावोगावी असलेल्या झेंडा किंवा गांधी चौकातील पार असो किंवा शहरा -शहरात असलेल्या जुन्या गल्लीतील कट्टे असोत, या इंटरनेट - माहितीच्या प्रसाराच्या वेगवान जंजाळात प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज, जाती समुह, जिल्हा - राज्य आणि देश पातळी, अश्या वेगवेगळ्या स्तरावर आपण व्यक्त होत आहोत. मनात असलेले सर्व काही share -like आणि कंमेंटीत आहोत, एकमेकांवरचे प्रेम -द्वेष- राग जोरजोरात सांगत आहोत, मांडत आहोत कारण यातून होणाऱ्या परिणामांची चिंता करायला सवड कोणाला आहे.
सवड असलीच तर ती अश्या लोकांना आहे ज्यांचे या सर्वातून होणारे परिणाम आणि त्यातून प्रवाहित होणारे बदल, हे बदल व्यक्ती, कुटुंब, समाज, जाती समुह, जिल्हा - राज्य आणि देश पातळीअसा स्तरावर आहेत आणि विचारांच्या आदान प्रदानातून मतपरिवर्तन होतं आहे. याचे परिणाम स्वरूप आपल्याला नको असलेली सगळी बाहेर येत आहे, यापूर्वी माहित नसलेली किंवा काही उपलब्ध नसलेली अशी माहिती, मग ती माहिती खेळ, इतिहास, भाषा, विज्ञान, मनोरंजन, अर्थ, बाजारपेठा ते पोर्नग्राफी अशी सर्वसमावेशी आहे.
१०-१२ हजार लोकसंख्येच्या गावात, ज्या ठिकाणी शालेय मुला-मुलींसाठी वर्षोनवर्षे ग्रंथालय बांधण्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावतीरिक्त फारसं काही झालं नाही. अवांतर वाचनाची आवड लागेल असं काही शाळेत उपक्रम नाहीत, पालकांना पोरांनी मार्क किती मिळवलेत याच्यापेक्षा जास्त जाणून घेण्यात रस नाही. मग अशी एक आख्खी पिढी, जी अचानक या माहितीच्या - अभिव्यक्त होण्याच्या स्पर्धेत येते. मोकळं रान मिळाल्यावर, कानात वार भरल्यासारखं मग ते शिंगरु उधळलं कि गप्प बसल. २००० साला नंतर ग्रामीण भागातून पदवी -पदवीत्तर शिक्षण घेऊन नोकरीसाठी स्थलातरीत झालेली अशी लाखों मुलं -मुली आप -आपली दिशा चाचपडत, ठेचखाळत शोधत निघाली, आपल्या गावातून बाहेर पडली आहेत. हि मंडळी आहेत ज्यातील काहींनी परदेश वाऱ्या केल्या आहेत, तिथलं मोकळी -ढाकळी संस्क्रुती, न्याहारीलाही बिअर ढोसुन ऑफिसला येणारे सहकारी बघितली आहेत आणि ही मंडळी जेंव्हा परत येतात तेंव्हा, याचे अनुकरण-प्रदर्शन ज्यांनी परदेश वारी केली नाही, करायची संधी मिळाली नाही त्यांच्यासमोर करतात, त्यात आता तडका मिळाला आहे टिक-टॉक, FB, youtube यासारख्या माध्यमांचा.
आपल्या लोकसंख्येतील मोठा गट हा २५-३५ वयोगटातील आहे, ज्यांची क्रयशक्ती सध्या त्यांच्या जीवनाच्या आलेखात सर्वोच्च पातळीवर आहे आणि त्याद्वारे मिळणारे अर्थार्जनसुद्धा काहींचे तेव्हढेच भक्कम आहे तर बहुतांश जणांचे सर्वसाधारण पातळीच्या वर आहे. यांचा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला आहे, ते बघतात ती चित्रपट-मालिका-नाटकं, ती वाचत असलेली पुस्तकं/e -पुस्तकं आहेत. हे सर्व ज्या साधनाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचत ती सर्व व्यक्तीकेंद्रित आहेत. कोठेही सामूहिक वाचन, कीर्तन किंवा संवाद, विवेचन असा नाहीये. Aspirational change - आकांक्षा बदलल्या आहेत आणि त्या कश्या साध्य होतील, कोणत्या पद्धतीच्या धोरणात्मक चौकटीत मिळवता येतील, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे, काय करावे किंवा करू नये, हे ती पिढी आप-आपल्या पातळीवर एकमेकांशी चर्चा -भांडण करत ठरवत आहे.
गांधीजी, सावरकर, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर यांची ओळख झाली ती शाळेतील इतिहासात आणि आता चालू असलेल्या राजकीय -सामाजिक संघर्षात ती परत वाचली जात आहेत. शाळेत शिकवलेला इतिहासचं खरा अशी समजूत होती, ती पूर्णपणे ध्वस्थ झाली आहे. काही नेत्यांनी तर त्या त्या समाजाचे नेतृत्व करणारे लोक/नेते त्यांच्या समाज्याच्या कोंदणात बंदिस्थ करून टाकले आहे. तुलनात्मक इतिहास, इतिहासातील संदर्भ जे आजपर्यंत गावोगावी पोहचत नव्हते, ते आता एक फॉरवर्ड वर तासाभरात देशभर पोहचत आहेत किंवा पोहचवले जातातं. त्याची शहानिशा करावी, संदर्भ खरा -खोटा पडताळणी करावी याची कोणाला गरज भासत नाही - कारण व्यक्त व्हायचं आहे, व्यक्त होण्याची अदृश्य अशी स्पर्धा आहे. यासाठी समाज माध्यमांना दोष देऊन चालणार नाही. शाळेत असताना निबंध लेखनाचा प्रश्न असायचा - TV शाप कि वरदान?? विज्ञान - शाप कि वरदान? वगैरे विषय दिले जायचे आणि नवनीत अपेक्षित मध्ये याची ठोकळ उत्तरदेखील असायची जी आम्ही पोरं रट्टा मारून लिहायचो.
अवांतर वाचन नाही, संदर्भ तपासून त्याद्वारे नवीन विचार निर्माण करून काही नाविन्यपूर्ण लिहावं अशी सवय नाही. बदलेल्या आकांक्षा, राजकीय -सामाजिक संघर्ष त्याला आरक्षणाची फोडणी मग इतिहासाची मोडतोड आणि स्वस्तातील इंटरनेट-मोबाईल यंत्र त्याला जोड आहे माहितीचा महास्फोट, अभिव्यक्त होण्याची चढाओढ - या सगळ्या गदारोळात नागरिक शास्त्र जे शाळेतच मुळात २० गुणांसाठी होते, जे त्याच वेळी ऑप्शनला पडले ते आता कोण गांभीर्याने वाचून -समजून -उमजून घेईल.
कोणी घेतलेच ते समझून - #कर्त्यव्य#हक्क#सामाजिक -#कौटुंबिक #मूल्य ( मूल्य शिक्षण पण ऑप्शनला बर का?) तर ते सांगितले गेले पाहिजे अश्या व्यासपीठावर ज्या ठिकाणी ही जनता ते बघायला - ऐकायला हजर असेल.

Thursday, 22 March 2018

सत्तेसाठी काय पण

केम्ब्रिज अनालिटीका हि कंपनी निवडणुका रणनीती कंन्सल्टंसी या व्यवसायात आहे. या कंपनीच्या वेबसाईटवर माहिती दिलीए त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या देशातील २०० निवडणूकाचं कँम्पेन सांभळलय आणि सर्वात भयानक असं केनीयाची निवडणूक. त्या देशातील सामाजिक सलोखा बिघडवून साधारण २०० लोकं दंगल सदृश परिस्थितीत मारली गेलीत व निवणुकीचा निकाल त्यांच्या ग्राहक, म्हणजे केनियाचा अध्यक्ष उहूरू केनयेट्टा याचा बाजूने कसा येईल याची तजवीज केली.

ज्यांनी निवडणूकसाठी रणनिती ठरवण्यासाठी करारबद्ध केलयं त्यांच्या विरोधकांची वैयक्तिक माहिती काढायची, काही सापडलं नाहीच तर त्याच्या अवती भोवतीच्या लोकांवर पळत ठेवून त्यांना जाळ्यात अडकवायचे आणि त्या विरोधी नेत्याच्या चरित्राची चिरफाड करणे, त्या देशातील समाजिक सलोखा बिघडवून दंगल घडवणे अशी सगळ्या उचापती केल्या आहेत. असा काहीश्या घटना भारतात गुजरात निवडणुकीच्या २-३ महिनेपूर्वी भारतात घडायला चालू झाल्या ज्या वेळी काँग्रेसने केम्ब्रिज अनालिटीका या कंपीनीशी करार केला. मागील वर्षी सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबईत लोअर परेलला स्टेशनवर अचानक गर्दीतील गडबडीमुळे चेंगरा चेंगरीत २२ लोक ठार झाले, याचबरोबर जुलै ते नोव्हेंबर २०१७ या दरम्यान देशभरात बऱ्याच रेल्वे अपघातांची शृंखलाच घडली.

माध्यमं, जनमानस एकदम बुचकळ्यात पडली तेंव्हा हे सगळं आचणकपणे सगळीकडे अपघात का घडताहेय. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण ( National Investigation Agency) या सर्वांचा तपास करत असताना ISI -पाकिस्तानचा या सर्वात हात आहे की काय, अशी शक्यता वर्तवली होती. जगभरात वेगवेगळ्या  देशांची सरकार किंवा ठराविक काही नेत्यांची सत्ता या आधीही उलथवली गेली आहेत. पुर्वी अमेरिकेची CIA, इंग्लंडची British intelligence/MI५, रशियाची KGB या गुप्तहेर संघटनामार्फत हे सगळं त्या देशाची सरकार असल्या उपद्व्यापी कारवाया करायची.

जागतिक महासत्ता म्हणवून घेणारे देश - अमेरिका, इंग्लंड यांना नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध देशात;आपल्या ताटाखालचे मांजरं असलेले आणि कठपुतळी बाहुले असलेले सरकार बसवायची असतात जेणेकरून त्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करता येईल. जगभरात असे कितीतरी हुकूमशाह दिसतील ज्यांना अमेरिका किंवा रशिया, त्यांची मित्र राष्ट्र यांनी सत्तेत आणलेलं असत आणि मग या देशातील बड्या बड्या उद्योगांना त्या हुकूमशाह मार्फत त्याच्या देशात खाणी, रास्ते - बंदर बांधणी, क्रूड ऑइल उत्खननाचे अधिकार दिले जातात.

आता २१व्य शतकात केम्ब्रिज अनालिटीका सारख्या खाजगी कंपन्याद्वारे सरकार उलथवली जात आहेत हाच काय तो फरक. हे काम या केम्ब्रिज अनालिटीका सारख्या कंपन्या प्रभावीपणे करत आहेत. ह्या कंपन्यांमध्ये CIA, British intelligence/MI५,KGB intelligence एजन्सीमधील गुप्तहेर लोकं या कंपनीने कामाला ठेवलेत किंवा त्यांनाच कंपनीचे भागीदार करुन घेतलय. या कंपन्यांमध्ये फक्त गुप्तहेर लोक आहेत असा नाही, मानस शास्त्राचे, निवडणुकांचे विश्लेषण करणारे तज्ञ मंडळीसुद्धा गलेलठ्ठ पगार देऊन ठेवली आहेत. एखाद्या मोठ्या अपघातानंतर तेथील लोकांची सोशल मीडियावर उठणारी प्रतिक्रिया, त्यांचे पृथककरण -विश्लेषण करून त्यांच्यापर्यंत त्या देशातील जो नेता किंवा पक्ष त्यांचा ग्राहक आहे त्याची त्या संदर्भातील दिलेलं मत व्यवस्थित पोहचवण्याचे काम या कंपनीचे हस्तक करतात. यामुळे त्या नेत्याची प्रतिमा उंचावली जाते.

हे सगळं करण्यासाठी लागणार पैसा उभा करायचा तर त्या नेत्याला निवडून आल्यावर केम्ब्रिज अनालिटीकाच्या गुंतवणूकदार/भागीदार लोकांच्या अमेरिका -इंग्लंड देशातील मालकांना परतावा द्यावा लागणार हे नक्की आहे. भारतातील काँग्रेस पक्ष्याने या कंपनीला गुजरात निवणुकीसाठी सल्लगार म्हणून नेमले होते आणि आपण बघितलेच आहे गुजरातमध्ये काय घडले. हिंदूंना फोडा आणि अल्पसंख्यान्कांची मत लाटा आणि सत्तेत या, काहीही करून मोदीला घालवा. आता कर्नाटक राज्यामध्ये निवडणुकीपूर्वी लिंगायत धर्माला हिंदू धर्मातून वेगळे करून, BJP चा मतदार फोडायच कारस्थान जोरात चालू आहे. केम्ब्रिज अनालिटीका कंपनीमध्ये कोण कोण गुंतवणूकदार आहे याचा तपशील आणि या कंपनीबद्दल, काँग्रेस बरोबर झालेल्या कराराची अशी सर्व माहिती वेगवेगळ्या वृत्तपत्रात आलेली आहे. (याच्या सर्व लिंक्स खाली देतच आहे, शंका नको)

हा राउल मेयोनो गांधीच व काँग्रेसच एकंदरीत धोरण "सत्तेसाठी कायपण" असंच आहे - मग भलेही देशाची शकलं होऊ देत नाही तर हजारो माणसांचा बळी जावो, काही देणं -घेणं नाही

a) https://www.nation.co.ke/news/politics/Guide-to-Cambridge-Analytica-Kenya-election-scandal/1064-4351156-jotwto/index.html

b) https://medium.com/textifire/a-special-relationship-the-birth-of-cambridge-analytica-97633129cb06

c) http://www.cbc.ca/news/world/kenya-election-1.4374593

d) https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/this-is-the-brahmastra-rahul-gandhi-will-hurl-at-pm-modi/articleshow/61003711.cms

e) http://www.firstpost.com/politics/congress-misused-services-of-cambridge-analytica-during-2017-gujarat-polls-says-bjps-ravi-shankar-prasad-4400919.html

शक्य झाल्यास हे Confession of an Economic Hitman by John Perkins पुस्तक मागवा आणि वाचा, जागतिक महासत्ता कश्याप्रकारे इतर देशात, त्यांच्या अंतर्गत राजकीय, उद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करतात आणि आपली पोळी भाजून घेतात आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी ते कोण कोणत्या मार्गांचा बेदरकारपणे वापर करतात याची वृस्तुत माहिती दिली आहे. 

Sunday, 17 September 2017

पेट्रोल दर - दिखावे पे मत जाव, अपनी अकल लगाव

गेले ४-५ दिवस झाले पेट्रोल दारावरून बरेच केंद्र सरकारवर टीका करणारे, मोदींची टिंगल -टवाळी करणारे विनोद, मेसेजेस आलेत. तस होणं अपेक्षितच आहे कारण ते सगळ्यात सोप आहे, मोदींना शिव्याशाप देणं ही सध्याची एक फॅशन आहे. धोरणात्मक दृष्ट्या त्यांना समर्थन द्याव तर लगेच त्या व्यक्तीला "हा मोदीभक्त" म्हणून हिणवण्याची ही लाट आहे, कारण त्यामुळे स्वतःच अज्ञान लपवता येत. असो, मुख्य विषयाकडे येतो, तो म्हणजे पेट्रोल दर.

आता, जर तुम्ही ONGC, IPCL, BPCL, यांच्या वेबसाईटवर जाऊन बघाल तर पेट्रोल, डिझेल यांच price calculation रोजच्यारोज, त्यादिवसाच्या क्रुड आईलच्या दरावर आधारित price built up तक्ता दिला जातो. केंद्रा सरकारचे कर लावुन सध्या पेट्रोल ५०-५३ रुपयेने विकलं गेल पाहिेजे. पण सध्या दर आहेत ७५-८० च्या दरम्यान. वरील जी काही रक्कम आहे ती राज्यांचे Excise/VAT मुळे आहे. याच मुख्य कारण म्हणजे, राज्य सरकारांनी गेल्या २ वर्ष्यात पेट्रोलवर लावला जाणारा VAT या करात केलेली वाढ, *का वाढ केली*? हे जाणून घेण्यासाठी थोडं ३ वर्ष्यातील GST लागू करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांशी केलेल्या वाटाघाटी आणि त्यामागील पार्श्वभूमी यांची माहिती करून घेणं अत्यंत महत्वाचे आहे.

14th Finance Commission चे सुचना एेकून केंद्र सरकारच्या महसुलाच्या 42% वाटा (तो पूर्वी 32% होता) राज्यांना द्यायचं मान्य केल्यावरच देशातील सगळी राज्य GST लागू करण्यास तयार झालीत. त्यातही, पेट्रोलियम उत्पादनावरील कर आकरण्याचा अधिकार राज्यांनी स्वत:कड ठेवलीयेत व त्यावर Excise/VAT वाढवुन ठेवलाय का तर GST मुळे होणारी महसुल घट यातुन भरून निघावी तर काही राज्यांनी घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्ज माफीसाठी पैसा उभारायचा आहे.

या सर्व कर रचनेतील बदलांचा व त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल दरांवर झालाय, हे अभ्यासपुर्ण मांडेल असा एक तरी शहाणा पत्रकार किंवा व्हाटसपी दाखवा. पेट्रोलवरील महाराष्ट्र राज्याचा कराचा वाटा २३.६ रुपये प्रति लिटर आहे तर केंद्र सरकारचा कराचा वाटा २१.५ रुपये प्रति लिटर आहे. या संदर्भातील सर्व आकडेमोड मुंबई आणि दिल्ली शहरांसाठी दिली आहे. हि आकडेमोड दररोज दिल्ली शहरासाठी PPAC ( Petroleum Planning and Analysis Cell) या वेबसाईटवर दिली जाते. इतरही राज्यामध्ये पेट्रोलियम उत्पादनावरील Excise/VAT कराचे दर हे वेगवेगळे आहेत, त्यानुसार पेट्रोल दर वेगवेगळे आहेत पण थोड्या फार फरकाने ते ७०-८० रुपये प्रति लिटर आहेत, याचाच अर्थ राज्य सरकारांनी अवाजवी आकारलेल्या करामुळे पेट्रोल दर चढे आहेत, यामध्ये काँग्रेस साशीत राज्यदेखील आहेत. पण, मोदींवर जोक मारणे सोपं आहे ना.


इतर राज्यातील पेट्रोल दर तुम्ही इथे बघू शकता

(http://hproroute.hpcl.co.in/StateDistrictMap_4/ms_hsd_price.jsp?param=C)

For some additional reading - on the key topics mentioned in above blog

1) https://factly.in/excise-duty-on-diesel-increased-by-over-380-in-3-years/

2) http://www.mycarhelpline.com/index.php?option=com_latestnews&view=detail&n_id=417&Itemid=10

3) http://www.livemint.com/Politics/30dUP67qdzMMYV83n1WLkK/Finance-Commission-suggests-raising-share-of-states-in-centr.html

Wednesday, 31 May 2017

जागतिक अन्न सुरक्षा आणि मटण - पर्यायी ध्येयधोरणं

जगभरात अन्न सुरक्षिततेस होऊ घातलेला धोका आणि त्यामागील कारणांचा उहापोह चालू आहे. जगात उपलब्ध असलेली शेत जमीन- जनावरांना चरण्यासाठीची सोडलेली "कुरणं" आणि मटणाची प्रति हेक्टरी उत्पादकता (सगळ्याच प्रकारचे मटण - डुक्कराचे, गायीचे, म्हैशींचे, मेंढी -शेळी इत्यादी) त्यावरील खर्च आणि त्याच्या सेवनातून मानवी शरीरास मिळणारी ऊर्जा इत्यादींचा अभ्यास केला जातोय.

याशिवाय मानवास लागणारे प्रथिने प्रति हेक्टरी आणि त्यावरील खर्च याचा तुलनात्मक अभ्यास या शोध निंबधात आहे (Global Food Security - http://www.sciencedirect.com/science/article/pii/S2211912417300056#) आणि यावरच Timothy Taylor यांनी ( Editor ऑफ Journal of Economic Perspective ) हि छोटी ब्लॉगपोस्ट लिहलेय http://conversableeconomist.blogspot.in/2017/05/meat-substitutessoy-mealworms-and.html.

याशिवाय जे पर्यावरणवादी आहेत आणि जे गोमांस खाऊन त्यांची आहार संस्कृती जपत आहेत त्यांनीही हे मुद्दाम लक्ष्यात घ्यावं, मटण उत्पादनासाठी जी जनावरं पाळली - पोसली जातात त्यांचा Green House Gas ( हिरवा वायू !!! ;) ) उत्सर्गात १२% वाटा आहे बरं.

सोयाबीन हे सर्वात किफायतशीर आणि पर्यावरण पोषक असा प्रथिनाचा स्रोत आहे आणि हे वरील शोध निंबधात स्पष्टपणे मांडलं आहे आणि त्यानुसार अन्न सुरक्षीततेच्या दृष्टीने धोरण बदल करणे आणि मटणाची मागणी कमी करणे किंवा प्रथिनांसाठी imitation meat, mealworms किंवा cricket insect (भारतीयांना cricket म्हटलं कि झालं) पर्याय उपलब्ध करून देणे अशा धोरणात्मक सूचना या शोध निंबधात आग्रह केला आहे.

वरील सर्व माहिती अगदी विज्ञानवादी आहे बरं आणि यासाठी त्याचे दुवे खाली दिले आहेत.

Reference -

१) http://www.economist.com/blogs/feastandfamine/2013/12/livestock

२) http://www.sciencedirect.com/science/article/pii/S2211912417300056#

३) http://conversableeconomist.blogspot.in/2017/05/meat-substitutessoy-mealworms-and.html.

ता. क. - गायींची कत्तल बंद केली म्हणजे, आहार बंदी कशी काय झाली बुवा. बाकीचे पर्याय आहेत कि - शेळी-मेंढा, कोंबडी-कोंबडा, म्हैस -रेडा (बीफ म्हणजे फक्त गायची मटण हे भारतातच आहे आणि या येड्या भक्तांची, फुरोगामी माकडांची समजूत आहे). ठीक आहे, ज्यांना आहार संस्कृती जपायची फारच खाज आहे आणि पैसाही आहे त्यांनी आयात करावं ना गायीचं मटण.

Wednesday, 12 April 2017

कर्जमाफी - उचलली जीभ लावली टाळ्याला

उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली हे बरोबर आहे पण पुढचे जे महत्वातचे आहे ते मात्र कोणी सांगत नाही. महत्वाची माहिती ती ही, पुर्ण माफ केलेल्या कर्जाची रक्कम आहे तब्बल रुपये ३६,३५९ कोटी आणि ही सगळी रक्कम त्या संदर्भीत बँकांना ५ हप्त्यात उत्तर प्रदेश सरकार चुकवणार आहे. सरकार ही रक्कम शेतकरी कर्ज दिलासा कर्जरोखेंचे द्वारे (bonds) उभी करणार आहे.

यातही महत्वाची गोष्ट की जे काही कर्जांना माफी दिलीये ती फक्त अल्प भूधारक शेतकऱ्यांना, तेही १ लाखा पर्यंतचे कर्ज सरकार भरणार आहे. जर कोणी ५-१० लाख घेऊन ठेवले असतील, ते माफ नाही होणार.

महाराष्ट्र राज्यातही शेतकरी कर्जमाफीची मागणी गेली १ महिन्यापासून जोर धरू लागलीय. पण आपले सरकार राज्याचे कर्ज कमी करण्यात गुंतले आहे. रिजर्व बँकेने नुकतंच त्यांच्या रिपोर्ट मध्ये सांगितलं, महाराष्ट्राने रुपये ११,२९० कोटीचे कर्जरोखे परत खरेदी करून राज्याच्या डोक्यावरील कर्ज कमी केले आहे. ( https://rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=39928)

मागील आठवड्यात सातारा येथील दोघे शेतकरी बंधूनी आत्महत्या केली, म्हणे ६० लाखाचे शेतीसाठी कर्ज घेतले. कोण घेतं हो ६० लाखाचे पीक कर्ज. बँक तरी देईल का ६० लाखाचे शेतीसाठी कर्ज आणि असलं कोणतं पीक घेताहेत हे शेतकरी.

तेंव्हा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा हेच योग्य आहे. एक मिनिटात निर्णय घेता येऊ शकतो पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला पाहिजे ना.

गेले काही दिवस शेतकरी आत्महत्या, त्यांची कारणे आणि उपाय याच्यावर जे काही संशोधनात्मक लेख, पेपर्स आहेत ते वाचतो आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदी संस्थेच्या  (NCRB - http://ncrb.nic.in/  ) माहितीनुसार भारतात साधारण ७५००-८००० शेतकरी आत्महत्या करतात त्यातील साधारण सरासरी ३१००-३२०० महाराष्ट्रातील शेतकरी असतात. महत्वाची गोष्ट लक्ष्यात घेण्यासारखी म्हणजे, सगळ्या आत्महत्या ह्या नापिकी किंवा कर्जामुळे नाहीयेत. महाराष्ट्र राज्यातील साधारण ४२% टक्के शेतकरी कर्जमुळे किंवा दिवाळखोरीमुले मृत्यु कवटाळतात हेच प्रमाण राष्ट्रीय पातळीवर ३८% आहे व पिका संदर्भातील अडचणीमुळे १९% टक्के शेतकरी आत्महत्या करतात. याचाच अर्थ असा की  ५७% शेतकरी कुटुंब आहेत ज्यांना मुळात मदत मिळाली पाहिजे ज्यांनी नापिकी किंवा कर्जामुळे स्वतःची देह टाकला बाकी ४३% शेतकरी आत्महत्या ह्या इतर कारणामुळे होतात त्यांना कर्जमाफीची कि इतर  मदत मिळता कामा नये. ( खाली दिलेली माहिती संदर्भ NCRB -२०१५ रिपोर्ट)



महाराष्ट्रातील ३१०० - ३२०० शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी १२००-१३०० शेतकरी हे कर्जामुळे किंवा पीक नुकसानी किंवा नापिकी या कारणामुळे होतात. यातही जिल्हानिहाय आकडेवारी बघीतली तर यवतमाळ, अकोला, अमरावती, बिड व लातूर ह्या जिल्ह्यामधे आत्महत्या जास्त आहेत.

जे शेतकरी कर्जामुळे मृत्यूला कवटाळतात त्यांचे सरासरी कर्जाची रक्कम हि सरासरी ३५,००० रुपये आहे. हि सर्व माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदी संस्थेच्या  (NCRB ) वार्षिक आणि तिमाही रिपोर्टस मध्ये उपलब्ध आहे, पण आपले चॅनेल वरचे पत्रकार आणि वृत्तपत्रे यांना हि सर्व माहिती उलगडून सांगायला वेळ नाही म्हणा किंवा एवढी मेहनत करण्याची त्यांची तयारी की योग्यता नाही म्हणा.




शेतकरी आत्महत्यांपैकी ७०-७५% शेतकरी हेय अल्पभूधारक (ज्यांची शेती २.५ एकर पेक्षा कमी आहे) आहेत (वर दिलेले सांख्यिकी माहिती NCRB च्या २०१५ च्या रिपोर्ट मधून). अशाच फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जावी. जे शेतकरी ५-१० किंवा १५ एकर बागातदार शेती ज्यांची आहे त्यांना कर्जमाफी मिळता कामा नये.

कर्जमाफी म्हणजे उगाच हुईई करून आदोंलन करत सगळ्यांचीच माफ करा अस सांगुन राजकारणी स्वत:ची सहकारी बॅकांमार्फत केलेल्या घोटाळ्यद्वारे फाटलेली पोती शिवणार. ज्या शेतक-यांस खरी गरज आहे तो राहतोच बाजुला.

उत्तर प्रदेश मध्ये दिली गेलीली शेतकरी कर्ज मदत मला वैयक्तिक तरी अजिबात पटत नाही. खाली दर्शवलेली राज्यनिहाय आत्महत्याची माहिती बघा. उत्तर प्रदेश मध्ये आत्महत्येचा प्रमाण हे इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. हि माहिती २०१५ ची आहे, कदाचित २०१६ सालामध्ये त्यात वाढ झाली असावी.

तेव्हा राज्यांच्या कारभ-यांनो होऊ द्या कर्जमाफी दमानं, होऊ द्या दमानं घाई नाही.

Tuesday, 7 March 2017

जागतिक महिला दिन - ३६५ दिवस

व्हाट्स अप वर सकाळपासून महिला दिन विशेष मेसजेचा पाऊस पडत होता. एरवी जी मित्र मंडळी वर्षभर स्त्रियांच्यावरअश्लिल विनोदांचा खच पाडतात, तिच्या दिसण्यावरून, कपडे घालण्याच्या पद्धतीनुसार तिला 
बेब, आयटम, सामान काय वाट्टेल ते बोलतात ...३६४ दिवस तिचाआदर नाही करत, आज अचानक महिला दिनानिमित्त लगेच स्त्रियांना शुभेच्छा पाठवतात. अक्षरसह: व्हाट्स अप वरुनच कानाखाली जाळ काढावा वाटतो अश्याच्या. 

हा, दिन साजरा झालाच पाहिजे पण तो ३६५ दिवस, वर्षभर ..

लक्ष्मी-भवानीमाता-चंडिका-सरस्वती 
अशी नानाविध रूप तिची
तिच्यात असलेल्या असम्य-दुर्दम्य सृजनशिल शक्तिला प्रणाम 

मनाला खूप भावलेली आणि अशीच व्हाट्स अप आलेली कविता 

आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा..!!
बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा..!!
सख्या,चुलत,मावस बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा..!!
मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला शुभेच्छा..!!
आज्जीच्या संस्कार सृष्टीला 
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला 
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला शुभेच्छा..!!
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत,वर्तमान,भविष्यकाळी  रणरागिनींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा

Friday, 3 February 2017

आम्ही सांगू तीच पुर्व

कालच व्हाट्सअप वर एक संदेश वाचला ज्यामध्ये आजकालची तरुण मंडळीना कशी वैचारिक झोप लागलीय, त्यांचं बौद्धिक कुपोषण झालाय याचा बराच उहापोह केला गेलाय. नाही, विषय एकदम बरोबरच आहे. ज्या लोकांना इतक्या दिवसाचे फुकट खाऊन खाऊन अजीर्ण झाल्यानंतर त्यातून भ्रष्टचाररुपी तुंबलेल्या गटारची दुर्गंधी सुटली आणि नेहरू-गांधी यांचं कसल्याही परिस्तिथितीत गुणगान गाण्याची जी सवय (हागवणूक) लागली, त्यांची हि सगळी थेरं  डोहाळे लावून सामान्य लोकांनीच उस्फूर्तपणे उजेडात आणली. यामुळे खरा राग आलाय या तथाकथिक पुरोगामी लोकांना.

या पुरोगाम्यांनी विद्यापीठ, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्या (?? कोंबड्याच्या झुंजी लावण्याऱ्या) ह्या सगळ्यां ठिकाणी त्यांची मक्तेदारी त्यांनी गेल्या ५५-६० वर्ष्याच्या काँग्रेसी सत्ताकाळात उभी केली आणि त्याद्वारे त्यांच्या विरोधी किंवा सहमत नसलेली विचारधारा दाबून ठेवली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, विद्यापीठात कोणा विध्यार्थाचा संशोधन निबंध मंजूर केला नाही तर कधी त्यांच्याशी सहमत नसणाऱ्यांना वृत्तपत्रे -वृत्तवाहिन्या व्यासपीठावर आवाज दिला नाही. वा  रे, पुरोगामी आणि हीच का तुमची व्यक्तिस्वातंत्राची परिभाषा. स्वतः म्हणू तीच पूर्व अशी हि वृत्ती आहे. आम्ही सांगू तेच नेते चांगले, आम्ही ठरवू तीच भारताची सांस्कृतिक ओळख, आम्ही लिहू तोच भारतीय मामूजान इतिहास आणि आम्ही सांगू तीच भारतीय सहीष्णूता.

या सर्व गोष्टीबद्दल उहापोह करून, त्याला पुरावे सादर करून खरी कि खोटी ती कितपत योग्य हे तपासायला नको कि तुम्हाला पोसण्याऱ्या काँग्रेसी सत्ताधीशांच्या सोयीची असणारी सगळीकडची वैचारिक मक्तेदारी आता उध्वस्त होतं आहे, हे खरं दुखणं सांगताही येत नाही.

समाज माध्यमेद्वारे ( ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप ) फिरणारी माहिती खरीच असते असं नाही पण ती पूर्णपणे खोटी असते किंवा त्यात बिलकुल तथ्य नसते असा एक समाज पसरवण्याचा हेतू आहे या लेखामागचा. समाज माध्यमेच्या द्वारे इंटरनेट वरील विकिपीडिया, परदेशातील विद्यपीठातील तिथे अध्यानाद्वारे जी तथ्य स्थापित झाली आणि त्यांच्या संदर्भाने भारतात पूर्वी लिहून ठेवलेली इतिहासात म्हणा किंवा समाजशाश्त्रातील जी काही डावी लेखणीद्वारे गृहीतक होती त्यांना आता आव्हान निर्माण होत चाल्लीयेत. मग करा आता दुष्प्रचार या समाज माध्यमांच्या विरोधात.

जरा निरीक्षण करा, गेल्या वर्षभरात काँग्रेसी आणि त्यांच्या डाव्या, फसव्या पुरोगामी लोकांनी ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप द्वारे ज्या लोकांनी त्यांना नागडं केलाय त्या सर्वाना आणि या व्यासपीठालाच खोटं माहिती देतात, लोकांना , तरुणांना चिथावणी देतात असल्या आरोपाद्वारे त्यांचा आवाज दाबण्याचा पद्धतशीरपणे एक कलमी कार्यक्रमचं चालू केलाय. जरा कोणी गांधी -नेहरूच्या चुकीच्या धोरणाची टीका केली किंवा सावरकरांची चांगली बाजू मांडली कि म्हणा त्याला "मोदी -भक्त" आणि कर त्याचा तोंड बंद. अशी हि यांची पुरोगामी वैचारिक उहापोहाची पद्धत. गांधी -नेहरू, डॉ आंबेडकर याची प्रतिमा एवढी  आवाजावजी मोठी केलीय आणि त्यांना देवाचं बनवून ठेवलय. जशी आता मोदींच्या प्रत्येक निर्णयाची चांगली - खराब अशी दोन्ही बाजूने वैचारिक चर्चा होते म्हणा, यात टिंगल टवाळीच जास्त आहे, तशी चर्चा का बुवा होऊ नये या नेत्यांच्या बाबतीत.

या लेखाचा दुसरा हेतू म्हणजे सामान्य लोकांना त्यांची स्वतःची अशी वैचारिक क्षमता  नाही आणि म्हणून या समाज माध्यमाद्वारे तयार झालेल्या तथाकथिक आभासी वास्तवावर विश्वास ठेवू नये अशा शहाणपणा हा लेख झोडतो. का बुवा, तुमच्या डाव्या वैचारिक  बैठकीचा धुव्वा उडवला जातोय म्हणून ते लगेच आभासी वास्तव आणि तुम्ही सांगाल तेच वास्तव का बरे मानावे. असं करताना मग या सामान्य लोकांची काय डुलकी लागत नाही काय कि तुमचे विचार हे एकदम प्रथिनयुक्त असून वैचारिक पोषण करणारे (कि हगवण लावणारे !!) आहेत.

थोडक्यात काय तर, दुसऱ्याचं ते कार्ट आणि माझा तो (राहुल)बाबा आणि आम्ही सांगू तीच (नेहरू-गांधी) पूर्व दिशा. आमच्याशी जो सहमत नाही ते सगळे "मोदी-भक्त" किवा  जल्पक (लोकसत्ताचे हुशार संपादक कुबेराचा हा शब्द आहे ट्विटर ट्रोल साठी).

ता.क . स्वतःची बुद्धी वापरून तुमच्या वाचनाची सवय जर चांगली झाली, देशो देशीचे संशोधनाचे ज्ञान समाज माध्यमावर तुमच्या दारात आले तर आम्ही आमची दुकान चालवयची कशी? हा प्रश्न विचारलं तर बघा हा, मोदी भक्त कुठले ;)

Tuesday, 13 October 2015

सामान्य जनतेच्या IQ'वर विश्वास ठेवा

२०१५ सालात चर्चवरील हाल्यांपासून (त्यांचा पुढे निष्कर्ष काय झाला कोणाला माहित नाही, आहे माहित कोणाला?) ते आता मागील आठवड्यातील दादरी घटनेपर्यंत अनेक वृत्यापात्रातून अग्रलेख, वितारवंताचे लेख, वाचकांचे बरेच पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व लेखामध्ये भारताची घटनादत्त प्राचीन अशी धर्मनिरपेक्षीता, सर्वधर्मसमभाव जी भारताची ओळख आहे ती फक्त तथाकथित पुरोगामी राजकीय पक्षांनी टिकवून ठेवली आहे, ती म्हणे धोक्यात आली आहे असा एक सूर उमटतो आहे. जणू काही, आता ती लगेच काळाच्या पडद्याआडच जाणार. आपल्या देशाचा, जनतेच्या निर्णयाचा इतिहास बघितल्यास असे काही होईल असं मुळीच वाटत नाही; कारण जी धर्मनिरपेक्षीता १९६९ च्या गुजरात, १९८४ च्या शिख, १९८९ च्या भागलपूर दंगलीमुळे आणि १९९२-९३ च्या बॅाम्बस्फोटानंतर झालेल्या दंग्यामुळे आणि या सर्व आणि या व्यतिरिक्त इतर काही घटनानंतरही टिकून आहे ती सध्याच्या काही घटनांमुळे कशी नष्ट होईल. पण, अशी आरोळी/आवाई सारखी सारखी ऊठवून ती नष्ट करण्याचे प्रयन्त मात्र नक्कीच होणार. भारतीय समाज मूळातच सहिष्णू आहे, लोकांना थोडं उशीरा का होईना पण शहाणपण आलेलं आहे. 

या सर्व ठेचा (मिरचीचा) खाऊन लोक बरेच समजूतदार झालेत, त्यात Whatsapp/फेसबुक/ट्विटर सारखे माध्यमांचा 'विधायक' उपयोग लोकांच्या लक्ष्यात आला आहे. त्यामुळे पुर्वीसारख कोणीही उपटसुंभ यावा, लोकांना चिथावणी देऊन अघटीत घडवून आणावं असा होणार नाही आणि आम्ही समजूतदार लोकं हे होवू  देणार नाही. 

माध्यमांनी त्याच काम मात्र चोख, प्रामाणीकपणे कराव. सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना टिकेने झोडपून काढा, पण जर ते चांगल काम करत असतील तर त्यांच कौतूक राहू दे, पण चांगल्या धोरणाबद्दल' प्रोत्साहन' तर द्या. भडक विधानांची भलावण माध्यमांनी टाळली पाहिजेत, कारण सध्या वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. याचं मूळ कारण म्हणजे, वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांच्या मालकांचे राजकीय लागेबांधे सगळे whatsapp/फेसबुक/ट्विटर च्या कट्ट्यावर उघड झाले आहेत, त्यामुळे लोकांना समजलंय कि यांना किती गंभीरपणे घ्यावं. तेंव्हा, माध्यमांनी आणि प्रस्थापित बुद्धिवाद्यांनी कितीही गळे काढले तरी सामान्य माणसांची मती ते भुलवू शकणार नाहीत आणि असेच जर ते करत राहिले तर सामान्य जनता याच्याकडे साफ दुर्लक्ष करेल. मला एवढेच म्हणायचे आहे, सामान्य जनतेच्या बुद्धीमत्तेला कमी लेखू नका, कारण यांनीच २०१४ मध्ये भ्रष्टाचाराची गटारी स्वच्छ केली आहे आणि तश्याच पद्धतीने ते जर वेळ आली तर तथाकथित धर्मवादी सरकार उलथवून टाकतील. (हिंदुत्ववादी नव्हे, कारण धर्मनिरपेक्षीतावदी हेदेखील छुपे धर्मवादीच आहेत). 

Friday, 14 February 2014

Valentine Special


माझ्या अर्धांगीनिसाठी काही शब्द 

The feeling felt at its best,
Holding Hands and Glance, 
Breathing together, Knowing each other,


Without saying a single word,
Walking through mountain adversaries with smile,
For each others smile..
Be My Valentine oh my Love Madhuri for all the journey of immortal time..

Tuesday, 11 February 2014

भारतीयत्वाची तहान, सामाजिक नाकार्लेपण आणि संधी

सत्या नाडेला  यांची मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी -CEO पदावर नियुक्ती झाली आणि भारतीय म्हणून थोड का होईना, आपल्या अंगावर मांस वाढले. आपल्या देशातील एक व्यक्ती शिकून, मेहनतीने उच्च पदावर पोहचल्याचा आनंद साजरा करावा कि नको? पण तो केलाच तर त्यातून काय बोध घ्यावा याबद्दल अतिशय तिखट शब्दात, योग्य अशा कारणासहित विवेचन लोकसत्ता संपादक श्री. गिरीश कुबेरांनी या लेखाद्वारे ( बेगने शादी मे ) केले आहे. श्री. कुबरांनी आपल्या या वृत्तीची अक्षरशा वाभाडे काढलेत आणि हा लेख वाचल्यानंतर माझी अश्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे खरे. हा लेख वाचल्यानंतर मी आपल्या या बांडगुळी भारतीयत्वाच्या तहानेकडे थोड्याश्या निराशेनच पाहत होतो.  मग दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या M.B.A. च्या प्राध्यापकांनी खूप छान आणि अगदी वेगळी प्रतिक्रिया फेसबुकवर नोंदवली आणि त्यामुळेच हि ब्लॉगपोस्ट तयार झाली.

बरेच भारतीय, जे सध्या "जागतिक भारतीय" म्हणून  सन्मानाने मिरवतात ते खरच आपल्या या "भारतीयत्वाचा" अभिमान बाळगतात कि नाही, जर तसा अभिमान असेल तर का आपण तो साजरा करू नये. उदाहरण द्यावयाचे झाल्यास प्रणव मिस्त्री  चे आपण देवू शकतो. त्याने स्पष्टपणे कबुल केले आहे, आजवर जे काही संशोधन त्याने केले आहे त्याची  प्रेरणा, स्फूर्ती त्याला आपल्या देशांतील सामाजिक समस्यांमधून आणि भारतीय पौराणिक गोष्टीतून मिळाली आहे. याशिवाय डॉ. शिव आय्यादुराई यांचेही उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यांनी ई -मेल क्रांती आणली, त्यांचे द ई -मेल रेवोलुशन खूपच प्रसिद्ध असे पुस्तक आहे आणि जे सध्या भारतीय प्राचीन सिद्ध -आर्युवेदिक औषधोपचार आणि आधुनिक आरोग्यशात्र यांची सांगड घालण्याचा प्रयत्न, संशोधन करत आहेत.   

ज्यांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध केल आहे असे भरपूर भारतीय आहेत, त्याचबरोबर भारतीयत्वाची ओळख पदोपदी, त्याच भांडवल न करता, जतन केली आहे अशा लोकांचे यश का म्हणून साजरे करू नये. याशिवाय जे लोक आपल्या लोकांच्या सन्मानाने हुरळून न जाता, आपल्या शैक्षणिक, समाजिक आणि राजकीय व्यवस्थेमधील पोकळपणा दाखवत असतील तर त्याने दुखी न होता त्यांवर सुधारणा शोधण्यात सुख मानावे. सध्याच्या घडीला यशस्वी "जागतिक भारतीय" यादी मोठी होत आहे आणि त्याबरोबर आपल्या इथिल शिक्षण संस्थामधून बाहेर पडून, आंतराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी अधिकारी, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रामध्ये जाऊन शास्त्रज्ञ/संशोधन करणारे वा तश्या संधी नाकारणारे काही कमी नाहीत. या आनंद उत्सवाला एक संधी का बर मानू नये?

गिरीश कुबेरावतीरिक्त मजेशीर, आपल्याला कोपरखळी मारत पण गंभीरपाणाचे पदर सुटू न देत,छोटीशी खास कोल्हापुरी भाषेच्या मुशीतून आलेली प्रतिक्रिया ही खाली दिलेली आहे. मूळ लेखक हे माझे M.B.A. सवांद कौशल्य आणि व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण सुधारणा विकास या विषयाचे प्राध्यापक श्री. राजेंद्र पारिजात ( ज्यांना मी खूप घाबरायचो, त्यांनी पहिल्याच दिवशी, पहिल्याच लेक्चर मध्ये पाय किती पाण्यात आहेत आणि  त्यामुळे किती हातपाय मारावे लागनार  आहेत हे सांगितले ) यांची आहे. 

सत्या तुझ्यासाठी कायपण!!



आयला सत्या तू एवढा मोठा व्हशील अस वाटल न्हवत गा!
शेवटी 'बिलू'बाला कल्ल कि तुम्च्याकडून घेण्यासारखं लई काय है म्हणून 
मागण लई नाही पण ते क्लोउड का काय त्यावर् न आमच्या गावच रस्ते करता येतील का त्ये बघ बाबा.… 
आणि सगळ्या हुशार पोरी बाली हु म्हणून फिरत्या त गा
पर कायदा करून बी 
वाकडी नजर न्हाय बदलली तुझ्या देशातल्या पबिलक ची ...
भावा अस काय तरी जमीव कि मनात कै झाल न्हव कि तुझ्या सरवर ला सायरन वाजला पाहिजे बघ .
सगळी गल्ली जागी होवून शान बुक्का झाला पायजे अल्स्यानचा 
त्यो केज्रीवालंचा अरव्या झाडू घेवून लागलाय मागे 
पन त्येला काय निभत नाही ते ... 
ते मफलर घेवून रसत्यावर झोपत्याल आणि परत ऑफिसला जात्याल
त्याला एक एम एस ओफ्फिस शिकीव म्हणजे झाले ..
आणि तरणी तरणी पोर पोरी घेतासा तुम्ही पण 
ती आय बापाला सोडून जात्याल न्हव का ?
तवा इथच गावा कड काय जमवता येतय का बघ कि गा !..
अजून आमच्या पाण्यात विष कालवून पित्याल रे ते 
जनावर आणि मान्स सगळी फुकापासरी मर्त्याल्च रे 
त्ये तुझा क्लोउद ला गिरीन हौसे च काय कसे व्हत नाही गा !
अशी फुकट मर्नार्यांचे काय तरी बग बाबा ...
तुला काय प्रत्यक्ष भेटू नाही जमल प्र फोटू बघितला , 
जीवाल काय तरी खा .. उगाच वणवण करू नग 
त्यो बिल्या हिकड भारतात फिर्तुया शेताव् र ण 
चैन्या करत .. तू तिकड एवढा घोर लावून घेवू नग ..
प्र काय बी म्हण 
सत्या 
एकदा 
नाद खुळा काम दावच सगल्यास्नी ...
तवा मग अहि पण म्हणू 
सत्या तुझ्यासाठी काय पन..
होवूंदे खर्च 
आमचा सत्या हाये गच्च ..."

Monday, 27 January 2014

वाचा NET-के

 वाचा NET-के 

सय  - सई परांजपे 

हे लोकसत्ता - लोकरंगमधील  ( दि. २६ जाने) लेख खूपच छान आहेत. याचबरोबर चतुरंगमधील,  (दि. २५ जाने २०१४ ) काळाच्या पुढे जाताना  - लेखदेखील खूपच छान असून "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी" का म्हटलं जात याची डोळस उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात. 


Friday, 24 January 2014

टिकटिक २०१४ …

"W for Watch… म्हणजे टिकटिक" शोमुबाळ सांगतो. खाऊ खात, दंगा मस्ती  करत माझा मुलगा A, B ,C… म्हणून टाकतो. टिकटिकागणिक तो मोठा होतो आहे आणि आम्ही सगळे मोठ्याचे छोटे होऊन परत अनुभवसंपन मोठे होत आहोत. काही महिन्यात तो २ वर्ष्याचा होतो आहे. नवीन वर्ष चालू होवून आता २३ दिवस झाले, हि टिकटिक किती दिवस, वर्षानुवर्षे चालू आहे, चालू राहील. दरवर्षी नूतन वर्षानिमित्त काही लेख येतात आणि बहुतेक सरलेले वर्ष बाळ म्हणून आले आणि म्हातारे होवून गेले, असा काहीसा संदर्भाने लिहिले गेलेले असतात. मला आपल वाटल, आपण जरा उलटा विचार करून बघू, म्हणजे "पोटली बाबा कि" या दूरदर्शनवरील मालिकेत जस तो म्हातारा बाबा गोष्टी सांगत-सांगत आणि गोष्टी जमा करत दिवसेंदिवस तरुण होत जात असतो तसाच काहीस!!

नवीन वर्ष येतच मुळात घेऊन अनपेक्षित गोष्टी आणि आपल्याला ते या गोष्टी सांगत तरुण होत शेवटी तान्हं बाळ होत आणि जाता -जाता पुढील वर्षासाठी अनुभव समृद्ध काळ मागे ठेवून सोडून जात. मला हे अस वाटण्यामागे आणखी एक कारण आहे. मागील वर्षी संप्टेंबर २०१३ मधे २०११ सालची लोकसंखेची एका वर्षातील वयानुरूप माहिती लोकसंख्या आयोगाने प्रकाशित केली आहे. २०११ हे भारताचे सर्वात तरुण वय, कारण १५-२४ वयोगटातील लोकसंख्या त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहचली आणि १५-६४ हा कार्यक्षम,क्रयशक्ती असलेले गट हा लोकसंखेच्या ६४% इतका होता. थोडक्यात २०११-२०१३ दरम्यान आपला देशाने त्याच्या ऐन तारुण्यात पदार्पण केले आणि पुढील ६ वर्षे तरुण राहील, म्हणजे २०२० साली सरासरी वय २९ असेल. या संदर्भाने विचार केल्यास दरवर्षी जगभरातील एखादा देश हा तरुण होत असेल आणि एखादाच्ये वय वाढत असेल, हो ना? 

मग, आपण येणारा काळ किंवा वर्षे  तरुण आहेत असे काही प्रमाणात म्हणू शकतो कि नाही?  कदाचित थोडा कल्पनाविस्तार असेल पण काय हरकत आहे असा विचार करायला. पोट्लीवला बाबा सगळीकडे फिरून लहान मुलांना छान छान गोष्टी सांगत नव-नवीन गोष्टी जमा करत तरुण होत जातो आणि लहान तान्हा होतो, तशीच हि पुढे येणारे वर्षे असू देत. 

लोकसंख्येबद्दलची माहिती खालील काही दुव्यावर उपलब्ध आहे आणि या अनुसंगाने येणारे आर्थिक धोरणे आणि सध्याची परिस्तिथी याबद्दल पुढील एखाद्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहीन.  

दुवे- http://www.censusindia.gov.in/2011census/population_enumeration.aspx
http://catalyst.nationalinterest.in/2013/09/09/the-age-of-india/
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6911544.stm

नवीन वर्ष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. 

Friday, 20 December 2013

गोंधळ बातम्या, गोंधळ चर्चा आणि आपली फसवणूक 


दूरदर्शनवरील बातमीपत्र आठवतात का रे तुला ? रोज सायंकाळी ७ वाजता असतात पण सध्या प्रदीप भिडेंचा भारदस्त आवाज नसतो. तो आवाज फक्त भारदस्त होता असे नव्हे त्याबरोबर एक संथ लयीवर सर्व बातम्या, दिवसभराच्या घडामोडी सांगितल्या जायच्या. कधीही , कुठेही घाई - गडबड आणि मुख्य म्हणजे आरडओरडा नाही. अजूनही दूरदर्शनवरील बातमीपत्र तशीच आहेत आणि मला अआवर्जून आवडतात बघयला. 

खाजगी वाहिन्या तांत्रिक दृष्ट्या प्रगत असतील पण त्यांना दूरदर्शनसारखी थोडक्यात, महत्वाचे आणि मोजक्या शब्दात सांगण्याची कला आणि कसब नाही अस वाटत. कदाचित, २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या असल्यामुळे तेथे बातमीपत्र "लांबलचक" आणि "दिलखेचक" अदाकारीने सांगितली जातात. बातमीपत्र सांगणारा/री यांचा पोशाख  पण कमालीचा बदलला आहे आणि ते सुटाबुटात दिसतात, महिला निवेदक सुद्धा!!. दूरदर्शनवरील निवेदक मात्र पारपंरिक आणि नाविन्य दोन्हींचा वापर करताना दिसतात. दीपावली, दसरा यासारख्या सणादिवशी हमखास पारपंरिक पोशाख त्यातही दूरदर्शनचे मात्र एवढे भारीतील नसतात पण खाजगी वाहिन्यावरील ( IBN -लोकमत, ABP -माझा ) निवेदक एकदम चमचमत असतात. 

हे सर्व वरवर दिसणारे फरक आहेत. मला ज्याकडे लक्ष वेधायचे आहे ते म्हणजे, खाजगी वाहिन्यावर असणारी चर्च्यासत्राकडे , ४-५ वेगवेगळ्या क्षेत्रातील ( त्याच्यादृष्टीने बुद्धिमान, विद्वान  हा !!)  लोकांना घेऊन जो गोंधळ घातला जातो त्यामुळे बातमी बघण्यातील सगळा रस निघून जातोय. चर्चासत्र चालू होते ते मुळात एखाद्या ब्रेंकिंग न्यूजने आणि त्यावर सगळी मंडळी, निवेदाकाबरोबर तो विचारील त्या प्रश्नाला उत्तर न देता आणि वेगळाच काहीतर मुद्दा सांगत /मांडत नाहक वादविवाद ( हीच का ती चर्चा ) करताना दिसतात. निवेदकपण काही कमी नाहीत. तो/ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो/ते  सगळ्यांना आणि प्रत्येकाची मते ( भाग घेणारी मंडळी स्वताचे  मत रेटत राहतात ) मागतो. राजकीय चर्चा असल्यास तर अजून फोडणी आणि भडका असतो. नेतेमंडळी आपला पक्ष कसा बरोबर ( घड्याळातील वेळ!!) आहे आणि तो किती निर्मळ ( कमळ नव्हे !!), स्वच्छ  ( हात असतात ) आहे हे अगदी पान खाऊन आणि तोंड रंगवून ( स्वताचेच)  बडबड करतात. 

या अश्या चर्चांमुळे आपण  मात्र एखाद्या घटनेचे गांभीर्य हरवून बसतो आणि मुख्य मुद्दा बाजूला जाऊन भलतीकडेच चर्चा संपते आणि लोक त्या बातमीकडे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पाहतपण नाहीत. हि एक प्रकारे आपली फसवणूक आहे ती नाही… हो फसवणूक कि हसवणूक!! कारण बातम्या, चर्चासत्र म्हणजे आता करमणूक झाली आहेत. पूर्वी अश्या कार्यक्रमातील लोक त्या घटनेतून बोध घेऊन शोधून शोधून एक तर त्याबद्दल लिहित किंवा त्याच्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत. आताही काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर सगळा उजेडच ??? ( उजेड कसा म्हणायचं  बर ) सगळा अंधारच आहे. ह्यातसुधा ती वाहिनी कोणाच्या मालकीची आहे त्यावर बातमीचा ढंग, निवेदन आणि त्याची तीव्रता ठरते. 

दीपक चौरासिया म्हणायचा "चैनसे सोना है, तो जाग जाओ" तसे आता म्हणायची वेळ आली आहे " छान बातम्या ऐकायःचा आहेत तर "दूरदर्शन " पहा"… फसवणूक करून घेऊ नका… 

Thursday, 19 December 2013

काय भावा, काय म्हणतोस !!!

किती वेळा विचार केला कि आपण पण ब्लॉग लिहावा आणि मनात येणाऱ्या विचारांचा जो खळखळ लोंढा आहे तो व्यवस्थितपणे पाटाच्या पाण्यागत मनाच्या शेतात फिरवावा. आता मुहूर्त झाला आहे आणि मनाचा संवाद चालू होऊन, आता  त्याच्याशी गप्पा मारणे आणि त्याचा शब्दरूप प्रवाह येते रिता करणे, म्हणजेच कोल्हापुरी शब्दात मी माझ्या मनाला रोज ( जमलं  तर !!) काय भावा, काय म्हणतोस  !!! म्हणणार आहे...